नाशिक : प्रतिनिधी
देशभरात भूगर्भामध्ये हायड्रो कार्बनचे साठे शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात साठ्यांचा शोध व सर्वेक्षण करण्यासाठी ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे (ओएनजीसी) पथक दाखल झाले असल्याची माहिती, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. दिंडोरी व आजूबाजूच्या तालुक्यातील भूगर्भात हायड्रोे कार्बन, पेट्रोलियम पदार्थांचे साठे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओएनजीसीच्या पथकाने बुधवारी (दि.14) दिंडोरी तालुक्यात येऊन सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. दरम्यान, दिंडोरीत हायड्रो कार्बनचे साठे असल्याच्या शक्यतेने स्थानिक ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.