Sun, Jan 19, 2020 20:56होमपेज › Nashik › नायलॉन मांजाने युवक जखमी

नायलॉन मांजाने युवक जखमी

Published On: Jan 02 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 12:04AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

दुचाकीवरून जात असताना गळ्यात नायलॉन मांजा अडकून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.1) सायंकाळी घडली. प्रदीप मोराडे (22, रा. भाभानगर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव असून, उपचारासाठी त्याला नेहते हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू असून, त्याकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचे उघड झाले आहे. मकरसंक्रांतीचा सण अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पतंगप्रेमींचा उत्साह वाढला असून, पुन्हा एकदा प्राणघातक नायलॉन मांजाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सोमवारी सायंकाळी भाभानगर येथे दादासाहेब सभागृह परिसरात मांजामुळे घडलेली ही पहिली दुर्घटना ठरली आहे.