होमपेज › Nashik › आता मुंबई-दिल्लीत छेडणार आंदोलन

आता मुंबई-दिल्लीत छेडणार आंदोलन

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:24AMपंचवटी : वार्ताहर 

आगामी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान पायर्‍यांवर बसून आंदोलन छेडायचे, त्यातून आ. छगन भुजबळ यांची सुटका करण्यासाठी सरकारवर दबाव आणायचा, वेळप्रसंगी दिल्लीतही आंदोलन करायचे, असा निर्णय भुजबळ समर्थकांनी घेतला. शनिवारी (दि.20) पंचवटीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबरच शिवसेना, भाजपाच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. 

दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या समर्थनार्थ आणि सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी भुजबळ समर्थकांनी पंचवटीत तपोवनातील जयशंकर गार्डनमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. भुजबळ समर्थक शांत बसलेले नाहीत, लढाई न्यायालयाच्या माध्यमातून लढावी, गावागावांत बैठक घेऊन लोकांची मते जाणून घ्यावी, भुजबळ नीतीतून चौफेर हल्लाबोल करण्यात यावा, राष्ट्रपती आणि राज्यपालांची भेट घ्यावी, जशास तसे उत्तर द्यावे, ओबीसींची ताकद दाखविण्यासाठी जनगणना करावी, राज्यभरात जेलभरो आंदोलन करावे, त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जेल भरोचे फॉर्म भरून द्यावे, गल्ली ते दिल्ली अशी आंदोलनाची व्याप्ती वाढवून दबाव निर्माण करून ओबीसींची ताकद दाखवावी, अशा पद्धतीने अनेकांनी आपले विचार मांडले. 

आमदार अपूर्व हिरे म्हणाले, जोशमध्ये काम करण्यापेक्षा विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होईल, त्यावेळी पहिल्या दिवसांपासूनच आम्ही आंदोलन सुरू करू. त्याचवेळी जर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले तर त्याबाबत आम्ही सरकारला प्रश्‍न विचारू आणि अधिवेशन काळात विचारलेल्या प्रश्‍नाला सरकारला उत्तर द्यावेच लागेल. बैठकीस आ. जयवंत जाधव, आ. अपूर्व हिरे, आ. नरहरी झिरवाळ, आ. अनिल कदम, परवेझ कोकणी, सुनील बागूल, अद्वय हिरे, गुरुमित बग्गा, राहुल दिवे, विजयश्री चुंभळे, जयदत्त होळकर, कोंडाजी आव्हाड, देवीदास पिंगळे, शोभा बच्छाव, दिनेश बच्छाव, कैलास कमोद, मधुकर जेजुरकर, सुनील फरांदे, दिलीप खैरे, अंबादास खैरे, बाळासाहेब कर्डक, जी. जी. चव्हाण, दिलीप बनकर, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार, भारती पवार, शोभा मगर, हिरामण खोसकर, विजय राऊत, अशोक दिवे, पंढरीनाथ थोरे, अर्जुन टिळे, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, कविता कर्डक, नलिनी सोनवणे, सुरेखा निमसे, प्रेमलता जुन्नरे, दीपाली कमोद, सुनील खोडे, योगेश कमोद, किशोर राजगुरू, वामन जेजुरकर, सुषमा पगारे, सुरेश खोडे, राजेंद्र महाले, मनोहर बोराडे, बाळासाहेब जानमाळी, दत्तात्रय माळी, मंगला माळी, मंगला जाधव, अनिल जाधव, ज्ञानेश्‍वर बोडके, लक्ष्मण मंडाले आदींसह सर्व पक्षांतील पदाधिकारी आणि भुजबळ समर्थक उपस्थित होते. 

समन्वय समिती स्थापणार
पुढील दिशा ठरविण्यासाठी भुजबळ समर्थक समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्या समितीच्या माध्यमातून राज्यभरात बैठकांचे आयोजन करून गल्ली ते दिल्लीच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे याची माहिती दिली जाणार आहे.