होमपेज › Nashik ›

शेतजमिनीलाही आता वार्षिक भाडे 
 

शेतजमिनीलाही आता वार्षिक भाडे 
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 2:11AMनाशिक : प्रतिनिधी

अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मनपाच्या वार्षिक भाडे मूल्य दराच्या रूपाने जिझिया कराला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे मनपा हद्दीत शेती असलेल्या शेतकर्‍यांना मनपाच्या या नव्या कराला सामोरे जावे लागणार असल्याने वर्षाला हजारो रुपये तिजोरीत जमा करावे लागतील.

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या अधिकारात 1 एप्रिल 2018 पासून नवीन मिळकती व मोकळे भूखंड तसेच जमिनींवर वार्षिक भाडे मूल्य दर निश्‍चित केला आहे. निवासी व अनिवासी वापराच्या मिळकतींवर प्रती चौ. फुट सरासरी दोन रुपये तर शेतजमिनी आणि मोकळ्या भूखंडांवर 40 पैसे प्रती चौ. फूट याप्रमाणे दर आकारला जाणार आहे. या नवीन दरामुळे मनपा हद्दीतील मिळकतींना वर्षाला हजारो रुपये कर मोजावा लागणार आहे. या वार्षिक मूल्य भाडे आकारणीला जनतेतून कडाडून विरोध होत असल्याने यासंदर्भात मनपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचाही विरोध वाढू लागला आहे. 

 Tags : Nashik,  annual, rent,  farming, land