Thu, Sep 20, 2018 17:05होमपेज › Nashik › निफाडचा पारा सात अंशांवर 

निफाडचा पारा सात अंशांवर 

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:52PM

बुकमार्क करा
लासलगाव : वार्ताहर

कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात सात अंश सेल्सिअस इतकी कमी तापमानाची नोंद रविवारी झाली. त्यामुळे निफाडला थंडीच्या कडाक्याने ग्रासले आहे. पारा घसरल्याने द्राक्षबागांना धोका वाढला आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. थंडी वाढत चालल्याने  परिपक्‍व होऊ पाहणार्‍या द्राक्षमण्यांची फुगवण थांबली आहे.  तर द्राक्षमण्यांवर भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. दोन दिवसांपासून थंडीचा पुन्हा जोर वाढला आहे.