Fri, Jul 19, 2019 00:52होमपेज › Nashik › राष्ट्रप्रेम वाढवून देशाला प्रगती पथावर नेण्याची गरज : गिरीश महाजन 

राष्ट्रप्रेम वाढवून देशाला प्रगती पथावर नेण्याची गरज : गिरीश महाजन 

Published On: Jan 26 2018 5:12PM | Last Updated: Jan 26 2018 4:51PMद्वारका : अमोल सोनवणे

जात, धर्म, पंत हा भेदभाव बाजूला ठेवून सर्वांनी देशासाठी एकत्र येउन, राष्ट्प्रेम वाढवून देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम करण्याची गरज सर्व देशवासियांना असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व नाशिक जिल्हाचे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताक दिना निमिताने आयोजित ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांना पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी राधाकृष्ण, जिल्हा परिषेदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक मीना, महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृषणा, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिघाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे , महापौर रंजना भानसी, आ. बाळासाहेब सानप,आ.देवयानी फरांदे आदी सह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी बोलताना महाजन म्हणाले,  प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव आहे. या लोकशाही राज्यात सरकारने  शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्व दिले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत सर्वात मोठी कर्जमाफी दिली आहे. तर, १३ लक्ष हेक्टर क्षेत्रात ३ हजाराहून अधिक पाणी वापर संस्था स्थापन करून विक्रमी सिंचन व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे केंद्र शासनाचा उत्कृष्ट सिंचनाचा प्रथम पुरस्कार राज्याला प्राप्त झाला आहे. मागेल त्याला शेततळे मध्ये ५ हजार शेततळ्याचे वाटप करण्यात आले आहे.

महाजन म्हणाले, समृद्धी महामार्ग हा आर्थिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. या महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याचा शासनाचा मानस असणार आहे.  हे काम करत असतानाच शेतकऱ्याच्या हिताकडे ही लक्ष देण्यात येणार असल्याचे महाजन यांनी  सांगितले. 

यावेळी महाजन च्या हस्ते मनपा अग्निशामक दलातील अधिकारी व  राष्ट्पतीं शार्या पुरस्कार पदक देऊन  दीपक गायकवाड, देविदास इंगळे, शिवाजी खुलने, शिवाजी फुगड, हेमंत बेलगावकर, बाळासाहेब लहानगे, अविनाश सोनवणे आदीचा गौरव करण्यात आला.

नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश मांडवे, पीपलगाव पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी, मालेगावचे पोलीस निरीक्षक राहुल कोलथे, येवला चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मालेगाव पोलीस निरीक्षक राहुल पाटील,सटाणा चे पोलीस निरीक्षक गणेश पुरी, आदींना पोलीस महासंचालक पदक देण्यात आले. 

प्रशिक्षक रॉईग अविनाश देशमुख,ज्यूडो प्रशिक्षक रवींद्र  मेणकर आदींचा सत्कार करण्यात आला. वेट लिफ्टिंग निकिता काळे, तलवार बाजी राहुल पडोल,शरीर शौष्ट मयूर देवरे आदी खेळाडूचा गौरव करण्यात आला.

पोलीस आयुक्तांलय,  पोलीस अधीक्षक कार्यालय, वाहतूक पोलीस , महिला पोलीस , होमगार्ड, अग्निशामक दल, भोसला मिल्ट्री स्कुल अश्ववा सह परेड आदर केली. परेड कमांडर सहायक पोलीस उपाआयुक्त विजय चव्हाण हे   होते. पोलीस दलातील विविध वाहने, जिल्हा रुग्णालय, झाडे लावा झाडे जगवा, आदिवासी संस्कृती, गाडगे महाराज स्वछता अभियान, समाज कल्यान विभागातील विविध योजनांची माहिती असलेले चित्ररथ ही सहभागी झाले होते. विविध शालेय विधार्थीनि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात फ्रावशी अकॅडमी च्या विद्यार्थीनीनी मल्लखांब, सूर्यनमस्कार, सारडा कन्या देशभक्ती पर गीत, ढोल पथक,  देशभक्ती गीताचे सादरीकरण करण्यात आले.

महाजन याना सदर कार्यक्रमात एकनाथ खडसे विषयी प्रश्न विचारला असता,  त्यांनी प्रजासत्ताक दिन असल्याने आपण या प्रश्नावर  बोलणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले