Tue, Jul 23, 2019 06:41होमपेज › Nashik › भुजबळांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज : आमदार कदम

भुजबळांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज : आमदार कदम

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 08 2018 11:23PMपिंपळगाव बसवंत : वार्ताहर

नाशिक जिल्ह्यात इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांकडे बारकाईने बघितले तर लक्षात येते की, विकासाची एक दूरद‍ृष्टी खर्‍या अर्थाने नाशिकचे माजी पालकमंत्री भुजबळ यांनी ठेवली म्हणून जिल्ह्याला न्याय मिळाला. यामुळे आज अडचणीच्या काळात सर्वांनी भुजबळांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन आमदार अनिल कदम यांनी केले.

पिंपळगाव बसवंत येेथे सोसायटी सभागृहात आयोजित ‘अन्याय पे चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी सरपंच भास्कर बनकर, समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक, पंचायत समिती सभापती पंडित आहेर, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, संदीप बनकर, आशिष बागूल, महेंद्र गांगुर्डे, सुभाष होळकर, दिलीप देशमाने, किरण लभडे, सपना बागूल, शीतल बनकर उपस्थित होते. मांजरपाडासारखा महत्त्वाचा प्रकल्प ग्रामीण भागासाठी भुजबळ यांनी आणला. परंतु सध्या त्याचे काम बंद आहे. 1999 ते 2014 पर्यंत नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास त्यांनी केला आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनचे उत्तम काम हे त्याचे एक उदाहरण आहे. त्यामुळे बहुजन समाजाच्या विकासासाठी काम करणार्‍या नेत्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी या प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भास्कर बनकर यांनी केले. यावेळी बाळासाहेब कर्डक, पंडित आहेर, चंद्रकांत खोडे, राजाभाऊ परदेशी, योगेश कुयटे, सत्यजित मोरे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. याप्रसंगी रामराव डेरे, प्रकाश देशमुख, विशाल मोरे, काशिनाथ विधाते, मनोज मुथा, दिलीप मौले, बाळासाहेब विधाते, श्रीनिवास गवळी, जगन्‍नाथ गवळी, विश्‍वनाथ भवर, तुकाराम भवर, सुभाष चोपडे, सुजित मोरे, नितीन बनकर, राहुल बनकर, सत्यजित मोरे, सुधाकर मेंगाणे, रामराव डेरे, राजेंद्र विधाते, कौस्तुभ तळेकर, चंद्रकांत बनकर, अशोक घुटे, राजू पाटील, प्रवीण घुमरे, भाऊ घुमरे, भारत गांगुर्डे, योगेश कुयटे, संजय वाघ उपस्थित होते.