Sun, Sep 23, 2018 07:58होमपेज › Nashik › ‘मोदी तुमच्या नावावर 15 लाखांचे कर्ज करतील’

‘मोदी तुमच्या नावावर 15 लाखांचे कर्ज करतील’

Published On: Feb 17 2018 2:41PM | Last Updated: Feb 17 2018 2:41PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

‘संयोजकांनी आज मला चाबूक भेट दिला आहे. चाबकाला बैल, घोडा हे प्राणी थोडे फार का होईना घाबरतात, मात्र गेंड्यांच्या कातडीच्या सरकारवर या चाबकाचा परिणाम होईल का नाही माहीत नाही; म्हणून या चाबकाचे सातत्याने फटकारे द्यावे लागतील, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला लगावला. निफाड येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

‘मोदींच्या कृपेने विजय मल्य्या , नीरव मोदी , ललित मोदी हजारो कोटी रुपयांना देशाला बुडवीत आहेत. आणखी काही बुडवे पुढे येतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्या खात्यावर 15 लाख रूपये तुमच्या खात्यावर टाकतील हे आता विसरा, तुमच्याच नावावर 15 लाखांचे कर्ज करून जातील हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून राष्ट्रवादीचे सर्वच नेते मराठवाडा पिंजून काढत आहेत. या सभेचा आज तिसरा दिवस आहे. या सभेवेळी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी संयोजकांनी जनविरोधी सरकारला वटणीवर आणण्यासाठी चाबूक भेट दिला तर काही शेतक-यांनी आपल्या उघड्या अंगावर आपल्या व्यथा लिहून निवेदन दिले.