Wed, May 22, 2019 15:10होमपेज › Nashik › सेना-भाजपाचे भांडण फक्‍त सत्तेच्या वाटणीसाठी

सेना-भाजपाचे भांडण फक्‍त सत्तेच्या वाटणीसाठी

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 1:02AMदिंडोरी : वार्ताहर

शिवसेना सुरवातीला विरोधी पक्षात बसली पण पाच मंत्रिपदे मिळताच सत्तेत सहभागी झाली. आता सत्तेत राहून जनतेचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी विरोधाचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढत आहे. शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्‍त सत्तेच्या वाटणीसाठी असून, शिवसेना ही पूर्वीची शिवसेना राहिली नसून ती भिवसेना झाली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार हे ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून फसविणार्‍या फसवणीस सरकारला धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

दिंडोरी येथे शिवसेना-भाजपा युती सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन सभा झाली. त्यावेळी मुंडे यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंडे यांनी लोकसभेपूर्वी गुजरातचे मॉडेल दाखवत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता मिळवली. 15 लाख बँक खात्यावर देण्याची आश्‍वासनपूर्ती केली नाही.

मोदी सरकारकडून देशाची फसवणूक : जयंत पाटील

निरव मोदींनी बँकेला गंडावल्याबाबत पीएमओ ऑफिसला माहिती असताना निरव मोदी मागील महिन्यात परदेशात पंतप्रधान मोदींसोबत दिसले त्यांचेवर कोणतीही कारवाई केली नाही अनथ मोदी पळून गेला. याला स्वतः मोदी जबाबदार आहे.