Tue, Aug 20, 2019 05:24होमपेज › Nashik › सीए परीक्षेत नाशिकचा हर्ष लोढा देशात १७ वा 

सीए परीक्षेत नाशिकचा हर्ष लोढा देशात १७ वा 

Published On: Jan 28 2018 10:56PM | Last Updated: Jan 28 2018 10:52PMनाशिक : प्रतिनिधी

इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीए इंटर (आयपीसी) परीक्षेचा निकाल रविवारी (दि.28) जाहीर झाला असून, नाशिकचा हर्ष संतोष लोढा हा देशात 17 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर, नाशिक विभागात लोढाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सीए परीक्षेचा हा दुसरा टप्पा असून, वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. नोव्हेंबर 2017 मध्ये ‘सीए’ इंटर परीक्षा झाली होती. रविवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. इंटर परीक्षेत दोन्ही गु्रपमध्ये देशभरातील 49 हजार 215 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता. त्यांपैकी फक्‍त 13 हजार 149 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामध्ये अहमदाबादचा जय धर्मेंद्रभाई सेठ हा 75.71 टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. कोलकात्याचा एस.अरविंद जयराम हा 74.14 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर नवी मुंबईची सीमरन किसार ही 74.43 टक्के गुणांसह तिसरी आली. नाशिकसाठी अभिमानाची बाब म्हणजे हर्ष लोढा हा देशात 17 व्या  क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. दोन्ही गु्रप मिळून 700 पैकी 497 गुणांसह त्याने 71 टक्के गुण मिळवले. तर, नाशिक विभागात तो प्रथम आला आहे. गु्रप एकमध्ये अकाउंट, लॉ, कॉस्टिंग व टॅक्स असा एकूण 400 गुणांचा पेपर असतो. तर, गु्रप दोनमध्ये अ‍ॅडव्हॉन्स अकाउंटिंग, ऑडिटिंग, आयटी असा 300 गुणांचा पेपर असतो.