नाशिक : गौरव जोशी
महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक गोड बातमी आहे. एकीकडे देशात यंदा साखरेचे जादा उत्पादन झाले असतानाच दुसरीकडे मात्र जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत आहे. परिणामी, निर्यात मंदावली असून, देशांतर्गत साखरेचे दर क्िंवटलला 3100 रुपयांपर्यंत घसरले आहेत. आगामी काळात दरामध्ये आणखी घसरण होणार असल्याने किरकोळ बाजारात साखरेचे दर 30 रुपयांच्या आत येणार आहेत. त्यामुळे साखरेचा गोडवा वाढणार आहे.
देशभरात यंदा ऊसाचे उत्पादन चांगले असून, अद्यापही महाराष्ट्रासह काही राज्यांमधील साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. त्यामुळे चालू वर्षी देशात 300 लाख टनांपर्यंत साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशाची वार्षिक साखरेची गरज ही 240 लाख टन असताना यंदा साखरेचे 60 लाख टन अतिरिक्त उत्पादन होणार आहे. दरम्यान, एकीकडे साखरेचे उत्पादन वाढले असतानाच दुसरीकडे मंदीमुळे जागतिक स्तरावर साखरेच्या भावात क्िंवटलला 2000-2200 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.
परिणामी, केंद्र सरकारने निर्यातीच्या दरात 20 टक्के कपात करूनही जागतिक स्तरावर भारताच्या साखरेला उचल मिळत नाही. त्यामुळे सध्याचा अतिरिक्त साठा बघता देशांतर्गत साखरेच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. 2015-16 मध्ये देशात उत्पादन वाढले असतानाच त्यावेळीदेखील जागतिक स्तरावर साखरेच्या दरात मोठी घसरण झाली होती.
परिणामी, तेव्हाही देशांतर्गत साखरेचे दर क्िंवटलला 2200 रुपयांपर्यंत. स्तरावरील मंदी यामुळे साधारणतः 60 लाख टन अतिरिक्त साखर देशात उपलब्ध असणार आहे. गतवर्षीचा व यंदाचा एकत्रित साठा केल्यास 100 लाख टन साखर देशात अतिरिक्त आहे. त्यामुळेच गेल्या महिन्याभरापासून साखरेच्या दरात घसरण होत असून, किरकोळ बाजारात साखर 30 रुपयांपेक्षा खाली येणार आहे.
पुढील वर्षीदेखील दरात घसरण
दर तीन ते चार वर्षांनी साधारणतः साखरेच्या दरात घसरण होते. यापूर्वी 2011 मध्ये साखर 4200 वरून दर 2700 रुपये क्िंवटलपर्यंत खाली आली होती. त्यानंतर 2015-16 मध्ये दर क्विंटलला 2200 रुपयांपर्यंत घसरले होते. दरम्यान, देशात यंदा 300 लाख टन साखरेचे उत्पादन होणार आहे. पुढील वर्षी हेच उत्पादन 325 लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गतवर्षीची 40 तर यंदाची 60 लाख टन अशी 100 लाख टन साखर अतिरिक्त आहे. त्यातच पुढील वर्षी 325 लाख टन उत्पादन अपेक्षित असल्याने 2019 मध्येही साखरेच्या दरात घसरणच पहायला मिळेल, अशी माहिती साखर व्यापार्यांनी दिली आहे.
tags : Nashik,news,excess, production,sugar, country,year,