होमपेज › Nashik › सर्वांच्या सहकार्याने नाशिक स्मार्ट सिटी होईल

सर्वांच्या सहकार्याने नाशिक स्मार्ट सिटी होईल

Published On: Dec 23 2017 2:10AM | Last Updated: Dec 22 2017 11:07PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होंत आहे. स्मार्ट सिटीसाठी सर्वच घटकांबरोबर क्रेडाईचे महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे. शहरातील महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची सोडवणूक करून नाशिक सर्वांच्या सहकार्याने निश्‍चितपणे लवकरच स्मार्ट सिटी होईल, असा विश्‍वास महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला.

नाशिक शहरामध्ये घराचे स्वप्न साकारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘शेल्टर 2017’ या भव्य गृहप्रकल्प प्रदर्शनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल,   मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष सुनील कोतवाल, प्रदर्शनाचे समन्वयक उदय घुगे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापौर भानसी म्हणाल्या की, सर्वांच्या स्वप्नातील स्वतःचे व हक्काचे घर शेल्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे. नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी क्रेडाईसह इतर संघटनांचे नेहमीच पाठबळ मिळत आहे. सिंहस्थ कुंभेळ्यात महत्त्वपूर्ण रिंगरोड झाले आहेत. परंतु, अद्यापही काही रिंगरोड लवकरच करणार असून, पार्किंगप्रश्‍नी लवकरच तोडगा काढला जाणार आहे. त्यामुळे सन 2020 पर्यंत नाशिकचा चेहरामोहरा बदललेला असेल, अशा विश्‍वास भानसी यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी क्रेडाईच्या कार्याबरोबरच शेल्टरची संकल्पना विशद केली. वैशाली बालाजीवाले यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनाचे समन्वयक उदय घुगे यांनी प्रदर्शनास सहकार्य मिळालेल्या सर्व संघटना, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांचे आभार मानले. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमास उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, ज्येष्ठ वास्तुविशारद एन. एम. आव्हाड, डॉ. कैलास कमोद, जितूभाई ठक्कर, नितीन वानखेडे, अ‍ॅड. जयंत जायभावे, अ‍ॅड.का.का.घुगे, प्रल्हाद कराड यांच्यासह क्रेडाईचे पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक, नगरसेवक व विविध क्षेत्रांतील मान्यवर  उपस्थित होते.