Thu, Apr 25, 2019 16:08होमपेज › Nashik › ‘एमपीएससी’त नाशिकचा विवेक धांडे ओबीसींत पहिला

‘एमपीएससी’त नाशिकचा विवेक धांडे ओबीसींत पहिला

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:50PM

बुकमार्क करा
नाशिक: प्रतिनिधी

एमपीएससीने घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकपदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील विवेक पंडितराव धांडे या विद्यार्थ्यांने राज्यात ओबीसी गटात प्रथम, तर सर्वसाधारण गटात दुसरा क्रमांक पटकाविला.  विवेक धांडे याने नामपूर येथे उन्नती शिक्षण संस्थेत प्राथमिक व माध्यमिक  शिक्षण पूर्ण केले. त्यानंंतर नाशिकला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदविका आणि पदवी शिक्षण पूर्ण केलेे. गत दोन वर्षांपासून राज्य सनदी सेवेच्या परीक्षेची तयारी धांडे याने केलेली होती. त्याला दुसर्‍या प्रयत्नात सनदी सेवेच्या मुख्य परीक्षेत यश मिळाले.  नायब तहसीलदारपदाची परीक्षाही धांडे याने उत्तीर्ण केलेली आहे. 

एमपीएससीत नाशिकचा विवेक धांडे ओबीसींत पहिला

मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकपदाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याने, धांडे याने मुलाखतीच्या तयारीला सुरवात केली आहे. मुलाने मिळविलेल्या यशाबद्दल विवेक यांचे वडील शिक्षक पंडितराव धांडे यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, विवेका हा लहानपणापासूनच खूप मेहनती आणि हुशार आहे. मॅकेनिकची पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने एमपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नसले तरी त्याने दुसर्‍या प्रयत्नात मात्र घवघवीत यश मिळविले. विवेकचा भाऊ अक्षय यानेही सीएआयडब्लू पूर्ण करून राजकोट येथे इंडियन ऑईल कंपनीत उच्चपदावर संधी मिळविलेली आहे, असे धांडे यांनी यावेळी सांगितले.