Thu, Jan 17, 2019 04:10होमपेज › Nashik › दाट लग्नतिथीमुळे तिन्ही महामार्ग जाम

दाट लग्नतिथीमुळे तिन्ही महामार्ग जाम

Published On: Dec 11 2017 1:59AM | Last Updated: Dec 11 2017 1:50AM

बुकमार्क करा

नाशिक /सिन्नर ः प्रतिनिधी 

रविवारी सायंकाळी नाशिककरांना शहरातून जाणार्‍या तिन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नाशिक-पुणे महामार्गावर रस्त्याचे काम सुरू होते तर नाशिक-औरंगाबाद आणि मुंबई-आग्रा महामार्गावर लग्नसराईमुळे ट्रॅफिक जाम झाली होती. यामुळे तिन्ही महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बंगालीबाबा आणि शिंदेगाव येथे अंडर बायपासचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी बघावयास मिळते. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. त्यात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीसच नसल्याचे चित्र होते. 
नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर अनेक मंगल कार्यालये आहेत. रविवारी मोठ्या प्रमाणात लग्नतिथी असल्याने बाहेरगावाहून आलेल्या वाहनांची तसेच वर्‍हाडी मंडळींच्या वाहनांची गर्दी असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.