होमपेज › Nashik › नाशिककर पुन्हा गारठले; तापमान ७.२ अंश सेल्सिअस

नाशिककर पुन्हा गारठले; तापमान ७.२ अंश सेल्सिअस

Published On: Jan 26 2018 1:17AM | Last Updated: Jan 25 2018 11:46PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिकमध्ये गुरुवारी 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हे तापमान राज्यात सर्वात नीचांकी ठरले आहे. नाशिककर पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्यावर पोहोचला होता. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतून नाशिककरांनी काही अंशी सुटका झाली होती. पण, तापमानाचा पारा पुन्हा घसरल्याने थंडीही परतली आहे. बुधवारी 8.8 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. गुरुवारी यात दीड अंश सेल्सिअसने घट झाली.