Tue, Mar 19, 2019 16:07होमपेज › Nashik › सोनई हत्याकांड; सहा आरोपी दोषी

सोनई हत्याकांड; सहा आरोपी दोषी

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 1:48AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

सोनई (जि. नगर) येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरविण्यात आले, तर एका संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दोषी ठरविण्यात आलेल्या सहाही आरोपींना गुरुवारी (दि.18) शिक्षा सुनावण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील सोनई येथे   प्रेमसंबंधातून मुलीच्या प्रियकरासह तिच्या दोन मित्रांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. संपूर्ण राज्यभर हे हत्याकांड गाजले होते. 

पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदीप माधव कुर्‍हे, अशोक सुधाकर नवगिरे अशी दोषी ठरलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अशोक रोहिदास फलके यास पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे.  मागासवर्गीय मुलासोबत मुलीचे प्रेमप्रकरण असल्याचे समजताच आरोपींनी मुलीचा प्रियकर सचिन सोहनलाल घारू (23) यास जिवे मारण्याचा कट रचला होता.