Thu, Jan 17, 2019 14:51होमपेज › Nashik › सोशल मीडियावर ‘थर्टी फर्स्ट’ची झिंग

सोशल मीडियावर ‘थर्टी फर्स्ट’ची झिंग

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:40PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले असून, सोशल मीडियावरही थर्टी फर्स्टच्या मेसेजचा महापूर ओसंडत आहे. पार्टीच्या ठिकाण निश्‍चित करण्यापासून ते चिकनच्या तंगडीवर मनसोक्त ताव मारण्यापर्यंतचे बेत आखले जात आहे. एकूणच सोशल मीडियावर थर्टी फर्स्टची झिंग पाहायला मिळत आहे. 2018 नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. 2017 ला गुडबाय करण्यासाठी ठिकठिकाणी उत्साहपूर्ण पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, पबमध्ये हळूहळू गर्दी होत आहे. त्यासाठी काहींनी पहिलेच टेबल बुक करून ठेवले आहे, तर काहींचे वर्षाचा शेवटचा रविवार बाहेरगावी उल्हासात साजरा करण्याचे नियोजन आखले जात आहे.

प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सोशल मीडियावरही थर्टी फर्स्टची धूम दिसून येत आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, हाईक, व्हाइबर आदींवर धम्माल मेसेज व हसून लोटपोट करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पार्टीचे ठिकाण, व्हेज, नॉनव्हेज मेनू, डीजे आदींचे नियोजन मनामनात सुरू असल्याचे चित्र आहे तर, काही जण देश-विदेशात जाऊन नववर्ष साजरे करण्याचे प्लॅनिंग करीत आहेत. काही जण नववर्षाचे स्वागत कसे करावे, नववर्षाचे स्वागत करताना फटाके फोडून प्रदूषण करू नये, डीजे वाजवून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, मद्य प्राशन करू नये, असे प्रबोधनपर संदेशाचे शेअरिंग करत आहे. एकूणच सोशल मीडिया थर्टी फर्स्टच्या जल्लोषात न्हाऊन निघाला आहे.