Thu, Jun 27, 2019 02:19होमपेज › Nashik › सिन्नरच्या जवानाची पत्नीसह काश्मीरमध्ये निर्घृण हत्या

सिन्नरच्या जवानाची पत्नीसह काश्मीरमध्ये निर्घृण हत्या

Published On: Nov 30 2017 11:30PM | Last Updated: Nov 30 2017 11:30PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका जवानाने स्वत:च्या पत्नीसह सहकारी जवान व त्याची पत्नी अशा तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडा भागात घडलेल्या या घटनेत मृत्युमुखी पडलेला राजेश किरण केकाण हा जवान सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहे.

किश्तवाडा येथील धुलास्टी एनएचसीपी पॉवर प्लँटमध्ये कार्यरत असलेल्या अयप्पा (पूर्ण नाव समजू शकले नाही. मूळ रा. तेलंगणा) याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून 16 फैरी झाडत पत्नी लावण्या अयप्पा, सहकारी जवान राजेश केकाण व त्याची पत्नी शोभा अशा तिघांची बुधवारी मध्यरात्री हत्या केली. 

या  घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी अयप्पा याला अटक केली आहे. मात्र, हत्येचे कारण समजू शकलेले नसले तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. राजेश केकाण व त्याचे कुटुंबीय गेल्या 15 वर्षांपासून चिंचोलीत (ता. सिन्नर) वास्तव्यास आहेत. केकाण याच्या पश्‍चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. राजेशचा भाऊदेखील सैन्यात कार्यरत असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे.