Mon, Feb 18, 2019 19:54होमपेज › Nashik › बँक संचालकांकडून होणार वसुली

बँक संचालकांकडून होणार वसुली

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:20PM

बुकमार्क करा
नाशिकः प्रतिनिधी

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी शासनाने न्यायालयात दावा दाखल केलेला होता. या दाव्याच्या विरोधात जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळातील 11 संचालकांनी याचिका दाखल करून त्याचा खर्च सुमारे  47 लाख रुपये अनाधिकृतरीत्या जिल्हा बँकेच्या तिजोरीतून केला. त्यामुळे त्याची वसुली या संचालकांकडून करावी, असे आदेश सहकार विभागाने दोषारोपपत्रात निश्‍चित केले आहेत.

त्यामुळे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक गणपत पाटील, संदीप गुळवे, धनंजय पवार, अद्वय हिरे, परवेज कोकणी, जिवा पांडू गावित, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, डॉ. शोभा बच्छाव, शिरीष कोतवाल यांच्याकडून प्रत्येकी चार लाख 26 हजार 568 रुपये वसूल करण्यात यावेत असे आदेश सहकार विभागाने दिल्याने आता बँक संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.