Fri, Sep 20, 2019 04:44होमपेज › Nashik › नाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम

नाशिकचे तापमान ९ अंशांवर कायम

Published On: Jan 02 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 12:09AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून, शहराचे किमान तापमान 9 अंशांदरम्यान कायम आहे. सोमवारी पहाटे शहरात 9.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  

काही दिवसांपासून जिल्ह्याचा पारा 7 अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे वातावरणात गारठा चांगलाच वाढला होता. 30 डिसेंबरनंतर तापमानात किंचित वाढ होऊन ते सध्या 9 अंशांवर कायम आहे. तथापि, रात्री व पहाटे थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे, तर सायंकाळनंतर शहरातील रस्त्यांवरील वर्दळीतही घट होत असल्याचे चित्र आहे. 

मध्य महाराष्ट्र, विदर्भ गारठलेलाच 

मध्य महाराष्ट्र, विदर्भ सोमवारीदेखील गारठलेलाच होता. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खालीच नोंदविला. नीचांकी किमान तापमानाची नोंद विदर्भातील गोंदिया येथे 8.4 अंश सेल्सिअस करण्यात आली; तर मुंबई 15.5, कोल्हापूर 14.7, पुणे 10.6, रत्नागिरी 16.9, जळगाव 10.6, महाबळेश्‍वर 13, नाशिक 9.4, सांगली 12.3, अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले.WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex