Sun, Nov 18, 2018 03:42होमपेज › Nashik › शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणारा नाशिकचा ‘रावडी २’

शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणारा नाशिकचा ‘रावडी २’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकच्या आकाश मुव्ही क्रिएशनने गेल्या वर्षी प्रथमच तयार केलेल्या ‘रावडी’ या अ‍ॅक्शन लघुपटाला मिळालेल्या अपूर्व यशानंतर आता ‘रावडी-2’ या सामाजिक अ‍ॅक्शनपटाची निर्मिती केली आहे. सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून बनविलेल्या या लघुपटात एका वेगळ्या पद्धतीने शेतकर्‍यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत.  या लघुपटाचा नुकताच एक ट्रेलर यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. एकाच दिवसात या ट्रेलरला तब्बल पाच हजार रसिकांनी पाहिल्याने लघुपटाची लोकप्रियता समोर आली आहे. 

दिग्दर्शक आकाश बागूल यांनी सध्या ‘महाराष्ट्रात ज्वलंत असलेल्या शेतकरी समस्या’ हा विषय घेऊन तयार केलेल्या या लघुपटात शेतकर्‍यांवर आधारित आगळीवेगळी कथा मांडण्यात आली आहे. नुकत्याच एका एंटरटेनमेंट शोच्या माध्यमातून या लघुपटाचे प्रदर्शन केले गेले. यासाठी खास मुंबईवरून ‘इंद्रा’ फिल्मचे संपूर्ण शिष्टमंडळ आणि दिग्दर्शक रमेश थोरात नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते ‘रावडी-2’चे उद्घाटन करण्यात आले. बिग बजेट असलेल्या या लघुपटातील अ‍ॅक्शन पाहिल्यावर तामिळ चित्रपटांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा लघुपट एंटरटेनमेंटने परिपूर्ण आहे. नाशिकमधील महाविद्यालयीन युवकांमध्ये या लघुपटाविषयी चर्चा आहे. लव्ह स्टोरी, ड्रामा, अ‍ॅक्शन, कॉमेडी, इमोशन्स, थ्रिल या सर्वच प्रकारांची सरमिसळ करून प्रेक्षकांसमोर शेतकर्‍यांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. कथानक सस्पेन्स विथ थ्रिलर असले तरी थोडक्यात एका लघुपटात रसिकांना फिचर फिल्मचा थरार अनुभवायास मिळणार आहे. सुमारे 48 कलाकारांनी परिश्रम घेतले आहे. त्यामुळे या लघुपटाला वेगळीच विशेषत: मिळाली आहे. विशेष म्हणजे  कुणाच्याही पाठबळाशिवाय तांत्रिक ज्ञान  नसतानाही स्वकर्त्वृत्वावर आणि टॅलेंटरवर बनविलेल्या या लघुपटाला रसिकांनी डोक्यावर घ्यावे, अशी अपेक्षा ‘रावडी-2’ च्या टीमने व्यक्त केली आहे.