Wed, Feb 20, 2019 08:43होमपेज › Nashik › नाशिक कनेक्टरसाठी पॉइंट ठरवा

नाशिक कनेक्टरसाठी पॉइंट ठरवा

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:22PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

समृद्धी महामार्ग नाशिक शहराला कनेक्ट करण्यासाठी पॉईंट ठरविण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या असून, पुढील आठवड्यात त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी दिली. समृद्धीसाठी राज्यात 36 टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा प्रकल्पाला विरोध नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

जिल्ह्यातील समृद्धी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मोपलवार शुक्रवारी (दि.29) नाशिकमध्ये आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरात प्रकल्पासाठीचा विरोध मावळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत आठवड्यामध्ये नाशिक दौर्‍यात शहरातून घोटीपर्यंत डेडिकेटर कनेक्टर टाकण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या कनेक्टरबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. विभागीय आयुक्त या कनेक्टरचा पॉइंट कोठे असावा हे ठरवतील. हा कनेक्टर पूर्णत: एक्स्प्रेस-वे सारखाच असल्याचे मोपलवार यांनी सांगितले.