Sat, Aug 24, 2019 22:30होमपेज › Nashik › महापालिकेत ७०० संगणक; डाटा एंट्री कर्मचारी मात्र तुरळक

महापालिकेत ७०० संगणक; डाटा एंट्री कर्मचारी मात्र तुरळक

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 1:45AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

महापालिकेतील बहुतांश सर्वच विभागांमधील कामकाज संगणकाच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, संगणक हाताळण्यासाठी डाटा एंट्रीची कामे करणारे कर्मचारीच मनपाकडे उपलब्ध नाहीत. आजमितीस जवळपास अशा 100 कर्मचार्‍यांची गरज आहे. परंतु, या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने संगणक असूनही कामे संथगतीने करावी लागत आहेत. मनपात आजमितीस जवळपास 700 हून अधिक संगणक आहेत. मनपातील संगणक विभागामार्फत या सर्व संगणकांची देखभाल केली जाते. मनपात बहुतांश सर्वच विभागात संगणकांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मात्र, अनेक कर्मचार्‍यांना संगणकाचे पुरेसे ज्ञान नसल्याने सध्या केवळ कामचलाऊपणा सुरू आहे.

यामुळे संगणकांच्या तुलनेत तितक्या क्षमतेने कामही होत नाही. सध्या महापालिकेत आउटसोर्सिंगने संगणक विभागात काही डाटा एंट्री कर्मचार्‍यांची पदे भरलेली आहेत. सर्वच विभागांचा विचार करता आजमितीस मनपात किमान 100 डाटा एंट्री कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे.   मूल्य निर्धारण व विविध कर विभाग, लेखा व वित्त, लेखा परीक्षण विभाग, नगररचना व मिळकत विभाग, आरोग्य व वैद्यकीय विभाग या काही विभागांसाठी तर संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे डाटा एंट्री कर्मचार्‍यांची तेवढ्याच प्रमाणात गरजही निर्माण झाली आहे.