Sun, Nov 18, 2018 03:10होमपेज › Nashik › स्वाती रनाळकर ठरल्या ‘मिसेस नाशिक आयकॉन’

स्वाती रनाळकर ठरल्या ‘मिसेस नाशिक आयकॉन’

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 24 2018 12:24AMनाशिक : प्रतिनिधी

स्कूल स्पोर्ट्स व यूथ असोसिएशनतर्फे आयोजित ‘मिसेस नाशिक आयकॉन 2018’ स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात पार पडली. स्पर्धेत स्वाती रनाळकर या ‘मिसेस नाशिक आयकॉन’ म्हणून विजयी झाल्या. अनघा धोडपकर यांना द्वितीय, तर गुंजन पुरोहित व प्रियंका घोगरे यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.  विश्‍वास लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला. महिलांचा आत्मविश्‍वास वाढावा, त्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेच्या निवड फेरीत 85 महिलांनी सहभाग नोंदविला. 50 महिलांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागासाठी वयोगटाचे बंधन नव्हते. त्यामुळे 25 ते 60 वर्षे वयाच्या महिलांनी एकाच मंचावर स्पर्धेचा अनुभव घेतला. अंतिम फेरीपूर्वी सात दिवस महिलांची कार्यशाळा घेण्यात आली. केवळ बाह्य रूपाकडे न पाहता, आत्मविश्‍वास व सादरीकरण यांचे परीक्षण करण्यात आले. शिल्पी अवस्थी, डॉ. सायली राऊत, श्रिया तोरणे, पूनम बेडसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. असोसिएशनच्या नाशिक जिल्हा सचिव प्रज्ञा भोसले-तोरसकर यांनी संयोजन केले.