Wed, Feb 20, 2019 04:30होमपेज › Nashik › नाशिकचा पारा पुन्हा १० अंशांवर

नाशिकचा पारा पुन्हा १० अंशांवर

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:03PMनाशिक : प्रतिनिधी

सोमवारी नाशिकमध्ये 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, नाशिककर पुन्हा एकदा थंडीचा अनुभव घेत आहेत.

गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. शुक्रवारपर्यंत तापमान याच दरम्यान असल्याने थंडीही गायब झाली. कुडकुडणार्‍या नाशिककरांना काही अंशी दिलासाही मिळाला होता. रविवारी तापमान पुन्हा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. त्यामुळे नाशिककरांनी  पुन्हा एकदा थंडीचा अनुभव घेतला.

सोमवारीही 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने गारवाही कायम होता. मकरसंक्रांतीपासून थंडी हळूहळू कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात मात्र तापमानाचा चढ-उतार अद्यापही कायम आहे.