Thu, Apr 25, 2019 13:25होमपेज › Nashik › नाशिक बाजार समितीची बरखास्ती लवकरच

नाशिक बाजार समितीची बरखास्ती लवकरच

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 02 2017 12:24AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासंदर्भातील निर्णय सरकारी पातळीवरून येत्या सोमवारपर्यंत प्राप्त होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.बाजार समितीचे तत्कालीन सभापती देवीदास पिंगळे यांच्या काळात झालेल्या आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी संचालक मंडळ बरखास्त का करू नये म्हणून नोटीस काढली होती. त्यावर सार्‍याच संचालकांना म्हणणे मांडण्यास संधी देण्यात आली होती. या प्रकरणावर सुनावणीही पूर्ण झाली असून, अहवाल मार्गदर्शनासाठी पणन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.आता यावर पणन संचालकांचे मार्गदर्शन प्राप्त झाले की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काही दिवसांपासून मात्र संचालक मंडळ बरखास्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत करे यांनी सरकारी पातळीवरून कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त न झाल्याचे सांगितले. 

एका संचालकाने खासगीत दिलेल्या माहितीनुसार येत्या एक-दोन दिवसांत बरखास्तीचे आदेश प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत आदेश प्राप्त होऊ शकतात. सोमवारपर्यंत तर नक्कीच येतील, असेही ठामपणे सांगण्यात आले. या आदेशाकडे कर्मचार्‍यांचेही लक्ष लागणार आहे. पिंगळे यांच्या रूपाने 15 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली बाजार समिती सध्या शिवसेनेकडे आहे.