Wed, Nov 21, 2018 19:25होमपेज › Nashik › खान्देश महोत्सवातून परंपरेचे दर्शन  

खान्देश महोत्सवातून परंपरेचे दर्शन  

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 29 2017 11:24PM

बुकमार्क करा
नाशिक : वार्ता

 महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशी संस्कृती, खाद्यपदार्थ, परंपरा, चालीरीती, शेती, व्यवसायाचे दर्शन नाशिककरांना होत आहे. ठक्कर डोम येथे सुरू असलेल्या या महोत्सवाच्या दोन दिवसांत 20 हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली असून, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली आहे.    महोत्सवाच्या प्रारंभी खान्देशची देवता असलेल्या कानुबाई मातेच्या मिरवणुकीत मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर रॅलीत टिपरी डान्स, डफ, वाघ्यामुरळी, लेझीम पथक आदी खान्देशी नृत्यप्रकारदेखील नागरिकांना बघावयास मिळाले. खान्देश कला मंचावर साहित्य संमेलन घेण्यात आले.

यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता, म्हणी व इतर साहित्यांचा ऊहापोह करण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी रामदास वाघ होते. तर परिसंवादात एकनाथ पगार, शंकर कापडणीस, विजया मानमोडे, विमल वाणी, बापूसाहेब हटकर आदींनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे घेण्यात आलेल्या भजन महोत्सवात 27 ग्रुपने सहभाग नोंदविला.  महोत्सवात विविध खाद्यपदार्थांसह वस्तूंच्या 125 स्टॉल्सचा समावेश आहे. दि.31 डिसेंबर पर्यंत चालणार्‍या महोत्सवास खांदेशी बांधवांसह नाशिककरांनी भेट द्यावी, असे आवाहन  महेश हिरे, रेश्मी हिरे-बेंडाळे, नुपूर बेंडाळे. मधुकर बागुल, अजय बिरारी आदीनी केले  आहेत.