होमपेज › Nashik › स्टेट बँकेत तासन्तास रांगा

स्टेट बँकेत तासन्तास रांगा

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 08 2018 11:07PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील उमराणे स्टेट बँक शाखेत कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्यामुळे ग्राहकांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे या शाखेत कर्मचार्‍यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्टेट बँकेच्या उमराणे शाखेत दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. ग्राहकांची संख्याही मोठी आहे. साहजिकच याठिकाणी ग्राहकांची गर्दी होते. परंतु, या शाखेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होतो. याठिकाणी कर्मचार्‍यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.