Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Nashik › अंजनेरी पर्वतावर उभारण्यात येणार महाध्वज

अंजनेरी पर्वतावर उभारण्यात येणार महाध्वज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

येवला : प्रतिनिधी

हनुमान जयंतीनिमित्त नाशिक जवळील अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज लावण्यात येणार आहे. हा ध्वज साधासुधा नसुन तब्‍बल ४८ फुट लांब आणि २४ फुट रूंदीचा आहे. ईतका भला मोठा ध्वज उभारण्यात येणार असल्‍याने हा ध्वज उभारण्याआधीच भक्‍तांमध्ये चर्चेत आला आहे. 

नाशिकजवळील अंजनेरी पर्वत हा हनुमानाची जन्मभूमी समजली जाते. गेल्‍या सात वर्षापासून दरवर्षी जय बाबाजी भक्त परिवाराकडून हनुमान जयंती निमित्त अंजनेरी पर्वतावर ध्वज लावण्यात येतो. येवल्याहून नाशिकजवळील अंजनेरी पर्वतावर भगवा ध्वज उभारण्याची तयारी पुर्ण झाली असून यावर्षीचा ध्वज त्‍याच्या मोठ्‍या आकारामुळे चर्चेत आला आहे. 

दरवर्षी या ध्वजाची लांबी रूंदी वाढवली जाते. यावर्षी या ध्वजाची लांबी २४ बाय ४८ फुट इतकी असणार आहे. या महाकाय ध्वजावर उभे असलेला हनुमान हा आपली छाती फाडून जय श्रीराम दाखवताना स्‍वरूपात  रेखाटण्यात आले आहे. पस्तीस ते चाळीस फुटाहून जास्त फुटाच्या बांबूला हा ध्वज लावण्यात येणार आहे. उद्‍या शनिवारी साजर्‍या होणार्‍या हनुमान जयंतीला अंजनेरी पर्वावर हा महाकाय ध्वज उभारला जाणार आहे.  


  •