Fri, Apr 19, 2019 08:16होमपेज › Nashik › रिलायन्सकडून गोदापार्कचे नूतनीकरण सुरू

रिलायन्सकडून गोदापार्कचे नूतनीकरण सुरू

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 11:37PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कचे सुशोभीकरण करण्याचे शिवधनुष्य पुन्हा एकदा रिलायन्स कंपनीने पेलले आहे. 2006 मध्ये गोदेला आलेल्या महापूरात गोदापार्कचा केवळ सांगडा उरला होता. त्यानंतर मनसेची सत्ताधार्‍यांनी नूतनीकरणाचे कामाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मनसे प्रमुखांनी शब्द टाकल्यानंतर रिलायन्सने गोदापार्क सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे.
मनसेने नाशिकरांना जी आश्‍वासने देऊन महापालिका निवडणूक जिंकली होती त्यात गोदापार्क हा महत्त्वाचा मुद्दा होता. राज ठाकरे यांनी रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून गोदापार्कला झळाळी देण्याचे काम केले होते.

या ठिकाणी सीआरएस निधीतून आकर्षक पथदीप, नदी काठाच्या दोन्ही बाजूला सकाळी मॉर्निग वॉकसाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता, नयनरम्य असे उद्यान आदींची निर्मिती करून  गोदापार्कला झळाळी देण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी गोदेला आलेल्या महापूरात गोदापार्क उद्ध्वस्त झाला होता. या ठिकाणचे पथदीप कोलमडले होते. पेव्हर ब्लॉक व फरशा उखडल्या होत्या. सुशोभीकरणासाठी कोट्यवधीचा केलेला खर्च महापूरात वाहून गेला. त्यानंतर सत्ताधारी मनसेनेच्या शिलेदारांनी राज ठाकरे यांच्या या ड्रीम प्रोजेक्टकडे दुर्लक्ष केले होते. सध्या महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपाने राजकीय सूडबुध्दीने या प्रकल्पाकडे कानाडोळा केला होता. अखेर राज ठाकरे यांनी शब्द टाकल्याने रिलायन्सने गोदापार्क सुशोभीकरणाचा पुन्हा पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शहीद अरुण चित्ते पूल येथील सुयोजीत उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. भविष्यात चोपडा लॉन्स ते शहीद चित्ते पूल या नदी मार्गावरील दोन्ही बाजूंचे सुशोभीकरण केले जाणार आहे.