Thu, Jul 18, 2019 06:07होमपेज › Nashik › ‘सुखोई-5’ लढाऊविमानाचे उत्पादन नाशिक एचएएलमध्ये

‘सुखोई-5’ लढाऊविमानाचे उत्पादन नाशिक एचएएलमध्ये

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:44PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सुखोई-30 वरून ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयोग नाशिक एचएएलने यशस्वीरीत्या केला. नाशिक एचएएलचे हे यश बघता येत्या सुखोई श्रेणीतील पाचव्या लढाऊ पिढीतील लढाऊ विमानांच्या निर्मितीचे काम नाशिकला देण्यात येईल, अशी घोषणा  संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केली. नाशिकच्या एचएएलमध्ये शुक्रवारी (दि.9) प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप (पीपीपी) 2017 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. भामरे बोलत होते. एचएएलने आजमितीस दोन सुखोई विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची यंत्रणा उभारली आहे. भविष्यात 40 विमानांवर अशाच प्रकारची यंंत्रणा उभारली जाणार असून, त्याचे काम नाशिकला देण्याची घोषणा डॉ. भामरेंनी केली. नाशिक एचएएलला सुखोई उत्पादनाचे काम 2019 पर्यंत सुरू राहणार आहे.

मात्र, त्यानंतर पुढे काय असा प्रश्‍न निर्माण झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये भीती आहे. मात्र, केंद्र सरकार या कर्मचार्‍यांच्या पाठीशी आहे. भविष्यातील पाचव्या पिढीतील लढाऊ विमानासह ‘तेजस’ आणि इतर विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे पुढील 30 वर्षांचे काम नाशिकला देण्यात येईल असे डॉ. भामरेंनी स्पष्ट केले. विमानांच्या निर्मितीचे काम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. यावेळी डीटीएल कंपनीने सुखोई-30 विमानाच्या 100 व्या सुट्या भागाचे हस्तांतरण एचएएलकडे करण्यात आले. कार्यक्रमाला एचएएलचे अध्यक्ष टी. सुवर्णा राजू, उदयंत मल्होत्रा, पी. जयपाल, दलजित सिंग, खा. हरिश्‍चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, आ. अनिल कदम उपस्थित होते.