होमपेज › Nashik › ढगाळ वातावरण; शेतकर्‍यांत चिंता

ढगाळ वातावरण; शेतकर्‍यांत चिंता

Published On: Dec 05 2017 1:46AM | Last Updated: Dec 04 2017 11:29PM

बुकमार्क करा

नाशिक ः प्रतिनिधी

वातावरणात दोन दिवसांपासून अचानक बदल झाला आहे. थंडीबरोबरच ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणाम द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बुरशीची लागण रोखण्यासाठी शेतकर्‍यांना फवारण्या कराव्या लागणार असल्याने ढगाळ वातावरणामुळे पिकांच्या रोगप्रतिबंधक खर्चाचे शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडणार आहे.

काढणीयोग्य स्थितीत आलेल्या द्राक्षघडांना ढगाळ वातावरणामुळे बुरशीची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी अधिक फवारणी करून रोगप्रतिबंधक उपाययोजना करावी. तसेच सकाळी धूर करून धुक्याचे प्रमाण कमी करावे, असा सल्ला जि. प. कृषी अधिकारी अभिजित जमदाडे यांनी दिला आहे.