Sat, Feb 23, 2019 01:59होमपेज › Nashik › शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरून डॉक्टरचा मृत्यू 

शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरून डॉक्टरचा मृत्यू 

Published On: Jan 16 2018 2:14AM | Last Updated: Jan 16 2018 1:42AM

बुकमार्क करा
नशिक : प्रतिनिधी

अंघोळ करताना शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरून डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूररोड परिसरातील कुसुमाग्रज स्मारकाजवळ घडली. डॉ. आशिष विलास काकडे (24, रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, कुसुमाग्रज स्मारकाजवळ, गंगापूररोड) असे या डॉक्टरचे नाव आहे.  सोमवारी (दि.15) सकाळी 11.30 च्या सुमारास वरच्या मजल्यावरून पाणी खाली येत होते. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी घरात शिरून पाहणी केली असता बाथरूममध्ये शॉवरमधून पाणी पडत होते आणि त्या खाली डॉ. काकडे खाली निपचित पडल्याचे आढळून आले. डॉ. काकडेंच्या अंगावर ठिकठिकाणी विद्युतप्रवाहाने भाजल्याच्या खुणा आढळून आल्या. शॉवरमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. डॉ. काकडे यांचे आईवडील नंदुरबार येथे वैद्यकीय सेवा बजावत आहे.