होमपेज › Nashik › जिल्हा परिषद अध्यक्षांकडून विभागांचा आढावा

जिल्हा परिषद अध्यक्षांकडून विभागांचा आढावा

Published On: Dec 30 2017 12:46AM | Last Updated: Dec 30 2017 12:46AM

बुकमार्क करा
नाशिकः प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समिती बेठक होणार असल्याने, त्यामध्ये जिल्हा परिषदेला किती विकासनिधीची मागणी करावी, याचा आढावा घेऊन तसा आराखडा देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी आज खातेप्रमुखांची बैठक घेऊन माहिती घेतली. जि.प.अध्यक्षा शितल सांगळे यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत पदाधिकार्‍यांसह  मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखाधिकारी सोनकांबळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्छाव, कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, महिला व समाज कल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे, बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

बैठकीत निधीची मागणी करताना शासनाने जे काटकासरीचे धोरण अवलंबले , त्याचा जिल्हा परिषदेच्या निधी मागणीवर किती परिणाम होऊ शकतो, त्याचबरोबर खातेप्रमुखांनी निधीसाठी कसा अहवाल केला आहे, याची माहिती अध्यक्षा सांगळे यांनी घेतली. शासनाकडून आगामी आर्थिक वर्षात 50 टक्के निधीला कपात लावण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चालु आर्थिक वर्षातही शासनाने प्रत्येक खात्याच्या निधीतून शेतकरी कर्जमाफीसाठी 30 टक्के निधीला कात्री लावली होती. त्यामूळे जि.प.च्या बर्‍याच योजनांचा निधी खर्च करताना प्रशासनाला कसरत करावी लागली होती. त्याचा परिणाम सदस्य आणि पदाधिकार्‍यांच्या गटातील विकासकामांवर झालेला आहे. त्यामूळे सर्वसामान्यातही लोकप्रतिनिधीबाबत त्याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. त्यामूळे डिपीडीसीच्या आगामी योजनानिधीमध्ये तरी ही कसर भरून निघावी आणि शासनाच्या काटकसरीच्या धोरणाला जिल्हा परिषदेचा आराखडा पुरक असावा, याची चर्चा यावेळी झाल्याचे समजते.