होमपेज › Nashik › नाशिक जिल्हा बँक अध्यक्षांची आज निवड

नाशिक जिल्हा बँक अध्यक्षांची आज निवड

Published On: Dec 23 2017 2:10AM | Last Updated: Dec 22 2017 11:33PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शेतकर्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज (दि.23) निवड होणार असून ज्येष्ठ संचालक माणिक कोकाटे, परवेझ कोकणी, केदा आहेर यापैकी नेमक्या कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपाचे संचालक सरसावले आहेत. सुरुवातीपासून कोकाटे आणि कोकणी यांच्यात स्पर्धा आहे. दुसरीकडे कोकाटे यांच्या आक्रमक स्वभावामुळे काही संचालकांची पसंती कोकणी यांच्या नावाला आहे. त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेच्या यशाचा धागा पकडून आमदार बाळासाहेब सानप यांनीही कोकणी यांचे नाव लावून धरले आहे. तर आपण अध्यक्ष होणार नसून, कोकाटे हेही नकोत, अशी भावना कोकणी यांनी पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यात अचानक आहेर स्पर्धेत आले आहेत.