नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, संचालक मंडळाला कारभार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बँकेचे अध्यक्ष केदा आहेर बुधवार (दि.7) पासून पुन्हा कामकाजाला सुरुवात करणार आहेत. न्यायालयाच्या या आदेशाने रिझर्व्ह बँक आणि सहकार आयुक्त कार्यालयालाच दणका बसला आहे.
ज्या कलमानुसार बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला होता, त्या कलमाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतरही स्थगिती मिळू शकत नाही, असा सहकार विभागाचा दावाही स्थगितीच्या आदेशाने खोटा ठरला आहे. नोकरभरती, रखडलेली वसुली, वाढलेला एनपीए, 120 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला नफा, विविध प्रकारच्या खरेद्या आदी कारणांमुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ डिसेंबर 2017