Sat, Sep 22, 2018 10:43होमपेज › Nashik › जिल्हा बँकेत कर्जमाफीचे २३४ कोटी रुपये जमा

जिल्हा बँकेत कर्जमाफीचे २३४ कोटी रुपये जमा

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 1:50AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा बँकेत 42 हजार 543 शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर 234 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या प्रोत्साहनपर अनुदानाचे 49 कोटी रुपये सोमवारी रात्री उशिरा बँकेला प्राप्त झाल्याचे वृत्त आहे. दीड लाख रुपयापर्यंतचे संपूर्ण थकीत कर्ज माफ केले जाणार आहे. दीड लाख रुपयावरील कर्जाचा लाभ वरील रक्कम भरल्यानंतरच शेतकर्‍यांना मिळणार आहे. जिल्हा बँकेत दीड लाख रुपयापर्यंत थकीत कर्जदारांची संख्या 90 हजार आहे. सरकारी पातळीवरून कर्जमाफीची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी 42 हजार 543 शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर 234 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  दुसरीकडे नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 25 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या पोटी जिल्हा बँकेने 79 कोटी रुपयांची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात 49 कोटी रुपये सोमवारी रात्री उशिरा बँकेला प्राप्त झाले. त्यामुळे या शेतकर्‍यांनाही कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.