Mon, Apr 22, 2019 16:24होमपेज › Nashik › सभागृहनेत्यांच्या पत्रप्रपंचाचे आज  पालकमंत्र्यांकडून ‘ऑपरेशन

सभागृहनेत्यांच्या पत्रप्रपंचाचे आज  पालकमंत्र्यांकडून ‘ऑपरेशन

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 24 2018 12:41AM’नाशिक : प्रतिनिधी

39 कोटी रुपयांच्या रस्ते देखभाल दुरुस्तीसंदर्भात सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या पत्राने मनपातील भाजपामध्ये मोठी खळबळ उडाली. सभागृहनेत्यांच्या पत्रामुळे अनेकांची अडचण निर्माण झाल्याने या पत्रप्रपंचाचे ऑपरेशन करण्यासाठी खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर आज (दि.24) नाशिकमध्ये तातडीची बैठक घेणार असून, मनपातील सध्याचा कारभार पाहता सर्वच पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. स्थायी समितीने रस्ते देखभाल व दुरुस्ती तसेच खडीचे कच्चे  रस्त्यांसाठी 39 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले असता या कामांच्या मंजूर दरास सभागृहनेते दिनकर पाटील यांनी हरकत घेतली. तसे पत्रही त्यांनी स्थायी सभापतींसह आयुक्त, 

 अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता आणि लेखा परीक्षकांना सादर केले. या पत्रामुळे कामे मंजूर करणारे पदाधिकारीच अडचणीत सापडल्याने विरोधक आणि नागरिकांच्या नजरेत संशयाच्या भोवर्‍यात अडकले. यामुळेच की काय या पत्राची दखल शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी घेत याबाबत पाटील यांना रामायण निवासस्थानी मंगळवारी (दि.23) सायंकाळी विचारणा केली. तसेच, शहराध्यक्ष या नात्याने त्यांनी ही बाब वरिष्ठांनाही कळविली. त्याचबरोबर इतरही काही पदाधिकार्‍यांनी वरिष्ठ नेत्यांच्या कानी यासंदर्भात तक्रारी केल्याने त्याची गंभीर दखल पालकमंत्री गिरीश महाजन व संघटनमंत्री किशोर काळकर यांनी घेत नाशिक येथे रामायण या महापौरांच्या निवासस्थानी सकाळी 10 वाजता सर्वच पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक आयोजित केली आहे.

गेल्या महिन्यातच मनपातील अंतर्गत कुरबूरीची माहिती थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोेचल्याने त्यांनीही पदाधिकार्‍यांचे कान टोचले होते. परंतु, त्यानंतरही कोणताच परिणाम काही पदाधिकार्‍यांवर झाला नाही. रस्ते देखभाल दुरुस्तीची कामे प्राकलन दरापेक्षा केवळ 18 ते 20 टक्के कमी दराने करण्याऐवजी 40 ते 45 कमी दराने का केले जात नाही असा प्रश्‍न पाटील यांनी उपस्थित करत यापूर्वीची कामे इतक्याच कमी दराने झाल्याचे पत्रात म्हटले आहे तर दुसरीकडे ठेकेदार इतक्या कमी दराने कामे कसे काय करू शकतात, असा प्रतिप्रश्‍न स्वत:च पत्रात उपस्थित केला आहे. यामुळे प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.