Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Nashik › नाशिक : अभियांत्रिकी विद्यालयसाठी शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

नाशिक : अभियांत्रिकी विद्यालयसाठी शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

Published On: Dec 20 2017 5:11PM | Last Updated: Dec 20 2017 5:11PM

बुकमार्क करा

नाशिक : हर्षवर्धन बोऱ्हाडे

२० नोव्हेंबर २०१७ ला दैनिक पुढारीने ‘आधुनिक शिक्षणापासून नाशिक रोड कोसो मैल दूरच’ अशी बातमी छापली होती. या बातमीची दखल घेऊन आमदार योगेश घोलप यांनी नाशिक रोड ला अभियांत्रिकी विद्यालय व्हावे अशी मागणी अधिवेशनात शिक्षण मंत्रांकडे केली आहे. या बाबत आमदार घोलापानी दैनिक पुढारीला खुलासाही कळवला आहे.

नाशिक शहराचा विस्तार होत आहे. नाशिक रोड ला पॉलिटेक्‍नीक कोलेज सोडून दुसरे शासकीय कॉलेज नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर वर जावे लागते. जिल्ह्याच्या बाहेरही विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जातात. म्हणून नाशिक रोड ला शासकीय अभियांत्रिकी विद्यालय व्हावे अशी मागणी देवळाली विधान सभा मतदार संघाचे आमदार योगेश घोलप यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नाशिक विभागात विकसित होणारे औद्योगिक क्षेत्र ,नोटांचा कारखाना ,नाशिक रोड आणि शहराच्या आसपास असणारी गावे वाड्या वस्त्या तसेच आदिवासी आणि आर्थिक दुर्बल घटकांचा विचार करता नाशिक शहराला जोडणारे भाग त्यात नाशिक रोड ही मुख्य वस्ती आहे . म्हणून नाशिक रोड ला अभियांत्रिकी विद्यालय झाले पाहिजे अशी मागणी घोलप यांनी शिक्षण मंत्री तावडे यांना केली आहे. नाशिक मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये नाहीत म्हणून अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने येथे अभियांत्रिकी महाविद्यालय होणे हि शहराबरोबर ग्रामीण भागाची गरज आहे. असा आशय निवेदनात समाविष्ठ केला आहे.    

या वर शिक्षण मंत्रांनी सकारात्मक विचार करून येत्या काही दिवसात निर्णय घेतला जाईल असे सांगितल्याचे घोलापानी म्हंटले आहे. नाशिक रोड ला अभियांत्रिकी महाविद्यालय झाल्यास विद्यर्थ्यांचे शिक्षणासाठी स्थलांतर वाचेल आणि इथल्या स्थानिकांना रोजगार उप्लाभ्ध होईल अशीही चर्चा शिक्षण मंत्रांसोबत झाली आहे.

‘’ नाशिक रोड च्या आसपास अभियान्रिकी महाविद्यालय आल्यास नाशिक शहराचा औद्योगिक आणि आर्थिक विकास होईल.इथल्या विद्यर्थ्याना रोजगार देण्यासाठी आम्ही काही कंपन्यांशीही चर्चा करीत असून अभियांत्रिकी महाविद्यालय होणे साठी शिक्षणमंत्रांनी अनुकुलता दाखवली आहे.’’ – आ योगेश घोलप