Mon, Jan 21, 2019 20:14होमपेज › Nashik › मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:49PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान बालंबाल बचावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाशिकमध्येही असाच प्रसंग शनिवारी (दि.9) सकाळी ओढावला. हेलिकॉप्टरने उड्डाण भरताच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्याची बाब निदर्शनास आली अन् पायलटने समयसूचकता दाखवत काही वेळातच हेलिकॉप्टर तत्काळ खाली घेतले.

शुक्रवारी (दि. 8) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहादा येथून रात्री उशीरा नाशिकला रवाना झाले. नाशिकमधील कार्यक्रम आटपून शनिवारी नाशिकहून औरंगाबाद येथील रवाना होण्यासाठी पोलीस परेड मैदानावर त्यांचा ताफा आला. मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व इतर जण हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर हेलिकॉप्टरने उड्डाण भरले. परंतु, एक मिनिटाच्या अवधीनंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्ड झाले. हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी संख्या अधिक असल्याचे निदर्शनास येताच त्यातून मुख्यमंत्र्यांच्या खानसामास उतरविण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांसह त्यांचे स्वीय सचिव व गिरीश महाजन यांना घेऊन पुन्हा ‘टेक ऑफ’ केले.