Sun, May 26, 2019 08:34होमपेज › Nashik › शूऽऽ.. सरकारी कामात अडथळा आणू नका!

शूऽऽ.. सरकारी कामात अडथळा आणू नका!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : रावसाहेब उगले

महामंडळाच्या बसचालक-वाहकांसाठी अलीकडे चांगलीच खुशखबर आली आहे म्हणे... प्रवाशांनी चालक-वाहकांच्या मनमानीला विरोध केल्यास सरकारी कामात अडथळा आणल्यास थेट गुुन्हाच दाखल होतो. त्यामुळे प्रवाशांनो, या मनमानीला विरोध कराल तर, आपण बसमधून थेट आरोपीच्या पिंजर्‍यात जाल..! नाशिक-1 आगाराने नुकताच तसा अघोषित फतवा काढल्याने खुद्द प्रवाशांमध्येच अशा चर्चा रंगल्या आहे.

गेल्या मंगळवारी (दि. 13) पिंपळगाव बसवंत स्थानकात वाहकाला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी (दि.14) मारहाण करणार्‍या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. मारहाण करणार्‍यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा तर मिळाली; परंतु नाशिक-1 आगाराच्या व्यवस्थापकांनी लांब पल्ल्याच्या बसेस पिंपळगाव बसवंत स्थानकात जाणार नाहीत, असा तुघलकी आदेश काढून एकप्रकारे अन्य प्रवाशांनाही त्या कृत्याची जणू शिक्षाच दिली आहे.


पैसे भरून  प्रवाशांना मनःस्ताप

प सटाणा-पुणे बस ज्यावेळी सटाणा स्थानकातून निघते, त्यावेळी बसमधील सर्वच प्रवाशांना पुणे येथे जायचे नसते. त्याचप्रमाणे पुण्याहून सटाण्याकडे निघालेल्या बसमधील सर्वच प्रवासी सटाण्याला जाण्यासाठी प्रवास करीत नसतात. हे प्रवासी या मार्गावरील थांबा असलेल्या गावांमध्ये उतरतात. मग केवळ ओझर, एचएएल, पिंपळगाव बसवंत येथील प्रवाशांनाच दुजाभाव का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अनेकदा पुणे-नाशिक मार्गावर वाहतूक ठप्प होते, तेव्हा तास-दोन तास बसचालक रहदारीत अडकतात. मात्र, ओझर, एचएएल, पिंपळगाव बसवंत याठिकाणी दोन मिनिटे बस थांबविण्याचे कष्ट चालक-वाहक घेत नसल्याने येथील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
 

 

 

tags : Nashik,news,bus, Corporation, Driver,carrier, protests, 


  •