Tue, May 21, 2019 18:11होमपेज › Nashik › इंडिया ग्रेप हार्वेस्टच्या माध्यमातून नाशिकचे ब्रॅण्डिंग

इंडिया ग्रेप हार्वेस्टच्या माध्यमातून नाशिकचे ब्रॅण्डिंग

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 26 2018 11:05PMनाशिक : प्रतिनिधी

जगभरात वाइन कॅपिटल अशी ओळख निर्माण झालेल्या नाशिक हे येत्या काळात कृषी विकासाला तसेच, पर्यटनाला अधिक वाव आहे. इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2018 च्या माध्यमातून  नाशिक व्हॅली अम्ब्रेला ब्रॅण्डचे प्रमोशन केले जात आहे. भविष्यात हा नाशिकचा ब्रँण्ड रोलमॉडेल ठरेल, असा विश्‍वास जयदत्त होळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान,येत्या 11 मार्चपर्यंत चालणार्‍या इंडिया ग्रेप हार्वेस्ट अंतर्गत ग्रेप कार्निव्हल घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण व एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन कुमार मुंडावरे उपस्थित होते.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नाशिक व्हॅली क्‍लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 9 फेब्रुवारी ते 11 मार्च या काळात इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. होळकर याबाबत माहिती देताना म्हणाले, नाशिकला कृषीची देण लाभली आहे. कृषी उत्पादनामुळे नाशिकचे नाव जगभरात पोहचले आहे. नाशिकला भविष्यात कृषी हबच्या माध्यमातून कृषी व्यवसाय तसेच कृषी पर्यटनासाठी मोठी संधी आहे. हीच संधी बघता इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2018 च्या माध्यमातून नाशिक व्हॅली अम्ब्रेला ब्रॅण्डचे प्रमोशन केले जात आहे. भविष्यात नाशिकमधून निर्यात होणारी द्राक्ष, कांदा, भाजीपाला, बेदाणे तसेच वाइन हे नाशिक व्हॅली अम्ब्रेला ब्रॅण्डच्या नावाखाली निर्यात व्हावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे होळकर यांनी स्पष्ट केले. इंडिया ग्रेप हार्वेस्ट 2018 पुढील टप्यात 2 मार्च रोजी इगतपुरीमधील भावली धरण येथील व्यंकटेश नगरमध्ये वाइन महोत्सव होणार आहे. त्यानंतर 3 तारखेला मोईत शॉदेंनमध्ये हा महोत्सव भरविण्यात येईल.

शिमग्याचा मुहूर्त साधत द्राक्ष बागांमध्ये महत्वाची भूमिका बजावणार्‍या आदिवासी कामगारांसोबत सुरगाण्यातील मोतीबाग येथे 4 मार्चला वाइन महोत्सव होणार आहे. दरम्यान, 11 मार्चला शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ग्रेप कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये हजारो नागरिक सहभागी होतील, असा विश्‍वास होेळकर यांनी व्यक्त केला.