होमपेज › Nashik › अंमळनेरचे ‘पुस्तक एके पुस्तक’ प्रथम

अंमळनेरचे ‘पुस्तक एके पुस्तक’ प्रथम

Published On: Jan 16 2018 2:14AM | Last Updated: Jan 16 2018 1:30AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे झालेल्या पंधराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या जळगाव-नाशिक केंद्राचा संयुक्त निकाल सोमवारी (दि. 15) सायंकाळी जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अंमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘पुस्तक एके पुस्तक’ नाटकाने प्रथम, कोकमठाण येथील ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘दांडगी मुले’ या नाटकाने द्वितीय पारितोषिक पटकावले. तर नाशिकच्या रचना विद्यालयाच्या ‘वन वे’ नाटकाला दिव्यांग उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले. 

येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृह व जळगावच्या भय्यासाहेब गंधे सभागृहात गेल्या आठवड्यात या स्पर्धा पार पडल्या होत्या. दोन्ही केंद्रे मिळून स्पर्धेत एकूण 47 नाटके सादर झाली होती. स्पर्धेचा निकाल असा : दिग्दर्शन : प्रथम : संदीप घोरपडे (पुस्तक एके पुस्तक), द्वितीय : किरण कुलकर्णी (गोट्या), द्विव्यांग उत्तेजनार्थ : धनंजय वाबळे (वन वे), प्रकाशयोजना : प्रथम : साक्षी पांडे (कमांडो एचटूओ), द्वितीय : प्रफुल्ल दीक्षित (ताटी उघडा), नेपथ्य : प्रथम : क्षितिज झावरे (मुलाकात), द्वितीय : सुयोग देशपांडे (ड्रायव्हर), रंगभूषा : प्रथम : माणिक कानडे (पाण्यापायी पडला घाव), द्वितीय : रूपाली गुंगे (मी पारंबी). 

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : भूमिका घोरपडे (पुस्तक एके पुस्तक), सोहम सहस्रबुद्धे (एलियन्स द ग्रेट), गुणवत्ता प्रमाणपत्रे : वृंदा घोलप (पाण्यापायी पडला घाव), सर्वज्ञा काळे (मुलाकात), गायत्री जोशी (ड्रायव्हर), जान्हवी माळी (कमांडो एचटूओ), सई मोराणकर (मला मोठं व्हायचंय), साहिल झावरे (मुलाकात), सुशांत दळवी (ताटी उघडा), ओम पाटील (गोट्या), हेमंत माळी (झपाटलेली चाळ), ओजस कुलकर्णी (गोट्या).स्पर्धेसाठी गिरीश भूतकर, शंकर घोरपडे व हनुमंत कुबडे यांनी काम पाहिले.