Tue, Aug 20, 2019 04:05होमपेज › Nashik › प्रधानमंत्री घरकुलासाठी गृहकर्ज देण्यास बँका राजी

प्रधानमंत्री घरकुलासाठी गृहकर्ज देण्यास बँका राजी

Published On: Dec 14 2017 2:53AM | Last Updated: Dec 14 2017 2:38AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत क्रेडिट लिंक सबसिडी या घटकांतर्गत येणार्‍या लाभार्थ्यांना साडेसहा टक्के व्याजाने सहा लाखांपर्यंतचे गृहकर्ज देण्यास अनेक वित्तीय संस्थांनी होकार दर्शविल्याने अनेकांच्या स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रधानमंत्री घरकुल योजनेसंदर्भात महापालिकेने शहरासह परिसरातील नागरिकांकडून अर्ज मागविले होते. ही योजना चार विभागांत विभागण्यात आली असून, सर्वाधिक अर्ज क्रेडिट लिंक सबसिडी या घटकात आले आहेत. या अर्जांची छाननी करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू असून, चारही घटकांसाठी मनपाकडे सुमारे 17 हजार अर्ज आले आहेत.

या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. क्रेडिट लिंक सबसिडी घटकांतर्गत 10 हजार अर्ज असून, संबंधितांना वित्तीय संस्था तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी साडेसहा टक्के व्याजदराने सहा लाखांपर्यंतचे कर्ज देण्याबाबत महापालिकेत 60 बँकांच्या प्रतिनिधी व शाखा व्यवस्थापकांबरोबर बैठक घेण्यात आली. त्यास सर्वच बँकांनी प्रतिसाद देत गृहकर्ज उपलब्ध करून देण्याबाबत होकार कळविला आहे. या योजनेविषयी सोशल मीडिया तसेच विविध माध्यमातून जागृती करण्यात येणार असून, हुडको व घरकुल लाभार्थ्यांचा करार करून घेतला जाणार आहे.