Sat, Sep 22, 2018 04:53होमपेज › Nashik › दूध : सकाळी ५० सायंकाळी ५४ रू

दूध : सकाळी ५० सायंकाळी ५४ रू

Published On: Jan 14 2018 2:22AM | Last Updated: Jan 14 2018 2:22AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

शहरासह परिसरातील बहुतांश दूध विक्रेत्यांकडून सकाळी आणि सायंकाळी दूधविक्रीचे दर वेगवेगळे आकारण्यात येत आहेत. सकाळच्या तुलनेत सायंकाळी दुधाचे दर जवळपास चार ते पाच रुपयाने अधिक असल्याने अनेक नागरिक सकाळीच दूध खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.  शहरातील अनेक दूधविक्रीच्या ठिकाणी दूध खरेदी करण्यासाठी नागरिक गेले तर त्या ठिकाणचा फलक सर्वांचेच लक्ष सध्या वेधून घेत आहे. तो म्हणजे सकाळ आणि सायंकाळी प्रतिलिटर दुधाचे दर असलेला तो फलक होय. सकाळच्या वेळी म्हशीचे दूध 50, तर गायीचे दूध 36 रुपये लिटर आहे. तर हेच दर सायंकाळी मात्र प्रत्येकी चार-चार रुपयाने वाढलेले असतात.

यामुळे अनेकांकडून सकाळच्या वेळीच दूध खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सकाळच्या तुलनेत सायंकाळी दुधाचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्यानेच दूधविक्रेत्यांनी सायंकाळच्या वेळी दर चढ्या भावाने ठेवण्याची शक्‍कल लढविली आहे. सकाळी दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत असतो. यामुळे कमी दराने दूध खरेदी करायची असेल तर सकाळचीच वेळ योग्य ठरत असल्याचे लेखानगर येथील विक्रेते पवन लोहट यांनी  सांगितले.