Thu, Jul 18, 2019 16:51होमपेज › Nashik › जि. प. अभियंत्याची खुर्ची जप्त

जि. प. अभियंत्याची खुर्ची जप्त

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 1:05AMनाशिक : प्रतिनिधी

भूसंपादनाचा मोबदला देण्यात असमर्थ ठरल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे (पश्‍चिम) विभागाचे कार्यकारी चंद्रशेखर वाघमारे यांची खुर्ची तसेच दोन संगणक जप्त करण्यात आले आहेत. वाघमारे यांना दुसर्‍यांदा या घटनेला सामोरे जावे लागले आहे. दिंडोरी तालुक्यात बंधार्‍याच्या कामासाठी पाच शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आली होती. गणपत भुसारे, लक्ष्मण ढेपणे, रामदास भुसारे, जगन भुसारे या शेतकर्‍यांचा त्यात समावेश आहे.

जमीन संपादनापोटी ठरलेला मोबदला देण्यात न आल्याने शेतकर्‍यांनी 2015 मध्ये जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तरीही मोबदला देण्यात उदासीनता दाखविण्यात आल्याने न्यायालयाने वाघमारे यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे शेतकरी शुक्रवारी दुपारी टेम्पो घेऊन थेट जिल्हा परिषदेत दाखल झाले. वाघमारे यांच्या खुर्चीसह दोन संगणकही टेम्पोत टाकून सोबत घेऊन गेले.