Fri, Jan 18, 2019 01:11होमपेज › Nashik › नाशिकच्या डॉ. सोनाली रॉय मिसेस इंडिया

नाशिकच्या डॉ. सोनाली रॉय मिसेस इंडिया

Published On: Jun 20 2018 1:14AM | Last Updated: Jun 19 2018 10:58PMनाशिक : प्रातिनिधी

शेतकरी कन्या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या नाशिकच्या सोनाली रॉय यांनी मॉडेलिंग फिल्मस व डान्स फेडरेशनद्वारा आयोजित स्पर्धेत मिसेस इंडियाचा मुकुट पटकावला. एकूण पाच हजार  स्पर्धकांतून विविध चाचण्या व फेरी नंतर ही निवड करण्यात आली.

या यशाबाबत बोलताना डॉ. सोनाली रॉय म्हणल्या की, अशा प्रकारच्या स्पर्धांत फक्त सौंदर्यच नाही तर बुद्धिमत्तेचीही चाचणी असते. अनेक नामांकित परीक्षक स्पर्धकांची कसोटी घेतात. अंतिम फेरीपूर्वी  तज्ज्ञांकडून स्पर्धेची तयारीही कसोशीने करून घेतली जाते.

यशाचे श्रेय डॉ. सोनाली रॉय यांनी आपले पती डॉ. संदीप रॉय, आपली मुलगी व परिवाराला दिले आहे. तसेच मिसेस वर्ल्डमध्येही सहभाग घेऊन भारताला यश मिळवून देण्याकरिता प्रयत्नही त्यांनी सुरू केले आहे.