होमपेज › Nashik › नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत रोहिदास बोंबले, आरती पाटील विजेते

नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत रोहिदास बोंबले, आरती पाटील विजेते

Published On: Jan 21 2018 6:42PM | Last Updated: Jan 21 2018 6:40PMनाशिक : वार्ताहर

नॅक फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिकरोड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत रोहिदास बोंबले व आरती पाटील यांनी बाजी मारली. या स्पर्धेत हजारो मॅरेथॉन पटूनी सहभाग घेतला होता. पुरूष गट, महिला गट, तसेच १८ वर्षाखालील मुला -मुली मध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. बिटको चौक ते नांदुर नाका, बिटको चौक ते दसक आदी मार्गावर ही स्पर्धा पार पडली. आंतरराष्ट्रीय धावपटू पुनम सोनवणे हिने देखील या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

नॅक फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेली ही मॅरेथॉन स्पर्धा विविध गटात पार पडली.  या मॅरेथॉन स्पर्धेत हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला होता. बिटको चौक ते नांदुर नाका, बिटको चौक ते दसक या मार्गावर ही  स्पर्धा पार पडली. विजेत्या स्पर्धकांना जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश राठोड, रवींद्र नाईक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

यावेळी बोलताना नाईक म्हणाले, जिद्द व मेहनतीने काम केल्यास हमखास यश मिळते. नॅक फाऊंडेशनने आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. याप्रसंगी रवी पगारे, राजेश आढाव, शोभा आवारे, शिवाजी कदम, मिलिंद बागुल, शैलजा उघाडे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र साळवे, कलीम शेख, गणेश कुलथे, हेमंत सोनवणे, राज पिल्ले, नंदू पगारे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार अमोल जगताप व विशाल निकम यांनी मानले.

पुरूष गट - रोहिदास बोंबले (प्रथम), दिनकर महाजन (द्वितीय), संताजी महाजन (तृतीय)

महिला गट - आरती पाटील (प्रथम), साईली मेंगे (द्वितीय), विनिता बोंबले (तृतीय)

१८ वर्षाआतील मुले - पवन तरपे (प्रथम), गणेश बोंबले (द्वितीय), नीरज यादव (तृतीय)

१८ वर्षाआतील मुली - पुनम सोनवणे (प्रथम), लक्ष्मी देवे (द्वितीय), दिशा बोरसे (तृतीय)