होमपेज › Nashik › नामको बँकेचाही भुजबळांना दणका

नामको बँकेचाही भुजबळांना दणका

Published On: Apr 11 2018 12:58AM | Last Updated: Apr 11 2018 12:55AMनाशिक :  प्रतिनिधी

माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ संचालक असलेल्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची मालमत्ता थकीत कर्जाच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंटस् सहकारी बँकेनेे जप्त केली असून, दोन महिन्यांत कर्ज न भरल्यास मालमत्तेची विक्री करून वसुली केली जाणार आहे.

माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ हे या कंपनीचे संचालक असून सत्येन केसरकर, दिलीप खैरे, विशाखा भुजबळ, शेफाली भुजबळ हे जामीनदार आहेत. कंपनीसाठी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने बँकेने मालमत्तेवर टाच आणली आहे. शेफाली, समीर आणि विशाखा भुजबळ यांच्या नावे बिगरशेती 4250 स्न्वेअर मीटर जागा, तर 60.47 स्न्वेअर मीटरवर बांधलेल्या कार्यालयाचाही त्यात समावेश आहे.

कर्जाची मूळ रक्कम चार कोटी 34 लाख 43,183 रुपये असून, 1 ऑक्टोबर 2017 पासून त्यावरील व्याजाची रक्कम थकीत आहे. ही रक्कम भरण्यासाठी साठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या मुदतीत कर्जाची फेड न झाल्यास मालमत्तेची विक्री करणार असल्याचे बँकेने सूचित केले आहे.  माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ हे पुतण्या समीरसह गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात आहेत. जामीन मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतानाच आता मालमत्ता जप्त करण्यात आल्याने भुजबळ कुटुंबीयांना दणका देण्यात आला आहे.
    

 

 

tags : Nashik,Recovery, by,Sale, of ,Property, Nomko, Bank,