Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Nashik › रेल्वे व्हील दुरुस्ती कारखान्यास मंजुरी

रेल्वे व्हील दुरुस्ती कारखान्यास मंजुरी

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:38PM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिकरोड येथे रेल्वेच्या व्हील दुरुस्ती कारखान्यास दिल्ली येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी त्यासाठी मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून, कारखान्यासाठी 53 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नाशिकरोड येथे रेल्वे इंजीन कारखान्यासाठी आरक्षित केलेली 250 एकर जागा मागील 45 वर्षांपासून विनावापर पडून होती. या जागेवर कारखाना उभा रहावा अशी मागणी खा.गोडसे